top of page

Prposed Marathwada Mukti Sangram Smarak, Chhatrapati Sambhajinagar

Architecture / Planning

Proposed

प्रेरणेची ज्योत : मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक

मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक हे मराठवाड्यातील प्रत्येक नागरिक व युवकांमध्ये एक प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करेल व देशभक्ती चे प्रेरणास्थान असेल.

ही वास्तू नुसते एक स्मारक नसून, मराठवाडा मुक्ती संग्रामच्या तेजस्वी वीरांना ही एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे जी आजच्या समाजातही त्यांचा अविचल संघर्ष, अविचल उत्कटता आणि अतुलनीय योगदान यांची आठवण करून देईल .

हे स्मारक स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, विजयेंद्र काबरा, रमणभाई पारिख, पी एच पटवर्धन आणि यांसारख्या अनेकांनी या प्रदेशाच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या लढ्यात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची तसेच त्यांच्या प्रचंड प्रयत्नांची आठवण करून देणारे, माहिती देणारे आणि प्रेरणा देणारे ठरेल.

स्वातंत्र्य आणि समानतेसाठी केलेल्या बलिदानाबद्दल भावी पिढ्यांना, हे त्यांचे जीवन अनुभव, सिद्धी आणि विश्वास यांचे पथदर्शक म्हणून काम करेल. विद्यार्थी, युवक व अभ्यागतांना देशप्रेम, न्याय, स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या शाश्वत मूल्यांवर चिंतन करण्यास प्रेरणा देईल.

हे स्मारक मराठवाड्याच्या सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्याप्रती अखंड भक्ती आणि तेथील लोकांच्या दृढ भावनेचे प्रतीक असेल.

Client

Category

Area

Date of completion

Cultural

4.5 Acre

Proposed

Drawings

Gallery

Sthapati Planners &

Developers Pvt. Ltd.

bottom of page